‘राधे’च्या कमाईतून कोरोनाबाधितांना मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता सलमान खानने मोठा निर्णय घेतला आहे. त्याच्या आगामी ‘राधे’   चित्रपटाच्या कमाईतील एक हिस्सा ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हेंटिलेटर आणि आवश्यक    उपकरणांच्या खरेदीसाठी खर्च केला जाणार आहे. कोरोना महामारीच्या काळात सुरुवातीपासूनच सलमानने   गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. आता सलमानने झी एंटरटेन्मेंटसोबत मिळून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

‘राधे’ या चित्रपटाच्या कमाईतील एक भाग ते कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी देणार आहेत. यासाठी त्यांनी गिव्ह   इंडिया संस्थेसोबत भागीदारी केली आहे. याअंतर्गत, आवश्यक वैद्यकीय उपकरणे दान केले जातील. 13 मे रोजी ‘राधे’ हा चित्रपट एकाचवेळी जगभरातील थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.