हेस्टर बायोसायन्सेसला 13.29 कोटींचा नफा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पशुधन आरोग्य सेवा देणारी कंपनी हेस्टर बायोसायन्सेसला डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या तिमाहीतील निव्वळ नफा 72 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 7.73 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता. 2020-21 या तिमाहीत निव्वळ विक्री 22 टक्क्यांनी वाढून 52.82 कोटी रुपयांवर गेली आहे, जी मागील वर्षी याच काळात 43.29 कोटी रुपये होती. तिसऱ्या तिमाहीत ईपीएस प्रति शेअर 15.62 रुपये नोंदविले गेले. 2021 मधील तिमाहीत ईबीआयटीडीए मार्जिन 38.97 नोंदवले गेले, तर निव्वळ नफा 25.16 टक्के होता, जे अपेक्षेपेक्षा अधिक चांगले होते.