‘लम्पी’चा फैलाव रोखण्यासाठी काय पावले उचललीत? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील ‘लम्पी’ विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी काय पावले उचललीत, असा सवाल उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केला. तसेच यासंदर्भात प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेश देत सरकारला धोरण आखण्यासाठी वेळ दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सरकारला विचारणा केली. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठापुढे बुधवारी ही सुनावणी झाली.

राज्याच्या ग्रामीण भागातील मोठय़ा प्रमाणावर गुरांमध्ये ‘लम्पी’ विषाणूचा फैलाव झाला आहे. याबाबत राज्य सरकारने परिपत्रके जारी करण्याव्यतिरिक्त काहीच ठोस पावले उचललेली नाहीत. गाईच्या उपचार आणि लसीकरणाबाबतही काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही, असा दावा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.