
सामना प्रतिनिधी, उरण
अवजड वाहनांची बेशिस्तपणे होणारी वाहतूक, त्यामुळे होणारी वाहतूककोंडी, अपघात यामुळे मेटाकुटीला आलेल्या उरणकरांच्या वेदनेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. या बेबंदशाहीला कारणीभूत असलेल्या जेएनपीटीसह सिडको, नॅशनल हायवे, महसूल आणि वाहतूक नियंत्रण विभागाला उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने अक्षरश: झापले. 30 वर्षांनंतरही अवजड वाहनांसाठी वेगळ्या मार्गिका तयार होत नसतील तर हे आश्चर्य आहे. जनतेच्या मूलभूत गरजेला शेवटचे प्राधान्य का दिले जात आहे, असा सवाल करतानाच यासाठी कारणीभूत असलेल्या अधिकाऱयांना जबाबदार धरा, असे आदेशच उच्च न्यायालयाने नवी मुंबई पोलिसांना दिले.
जेएनपीटीतून सुटणाऱया अवजड वाहनांचा भयंकर त्रास उरणवासीयांना रोजच भोगावा लागत आहे. या अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग तयार केला नसल्याने वाहतूककोंडी, अपघात रोजचेच झाले असून याविरोधात उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेतील समस्यांबाबत सरकारची बाजू मांडण्यासाठी न्यायालयाने सरकारचे ऍडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
न्यायालयाचे फटकारे
ह जेएनपीटी बंदर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयदृष्टय़ा महत्त्वाचे आहे. येथे प्रचंड प्रमाणात रहदारी असलेल्या अवजड वाहनांसाठी रस्त्यावर पुरेशा मा\गका असणे ही प्राधान्याची बाब आहे. परंतु आज 30 वर्षांनंतरही या मूलभूत गरजेला शेवटचे प्राधान्य दिले जात आहे. हे आश्चर्यकारक आहे.
ह रस्ते सुनियोजित आणि अपघातमुक्त तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावेत ही सामान्य अपेक्षा असते. म्हणून या रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणाऱया अधिकाऱयांना जबाबदार धरावे.
उरणवासीयांच्या व्यथा
या अपघातठास्तांना तातडीची आर्थिक मदतही मिळावी. अवजड वाहनांसाठी पुरेसे रस्ते व वेगळ्या मार्गिका तयार करण्यात याव्यात. वाहतूक नियंत्रणाची स्वतंत्र व्यवस्था करावी. आदी मुद्दे याचिकाकर्त्यांच्या वकील प्रियांका ठाकूर यांनी मांडले.
सरकारची हतबलता
जेएनपीटी, सिडको, नॅशनल हायवे, महसूल वाहतूक नियंत्रण विभाग आणि आरोग्य विभागाच्या बेफिकिरीमुळेच उरणमधील नागरिकांना मोठय़ा समस्यांचा सामना करावा लागत असल्याची कबुली राज्य सरकारचे ऍडव्होकेट आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयासमोर दिली.
summary- high court chided on jnpt over uran issue






























































