बहिणीने घरात राहू न देणे कौटुंबिक हिंसाचारच, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा; विधवेला दिलासा

भावाच्या विधवेला बहिणीने घरात राहू न देणे हा कौटुंबिक हिंसाचाराच आहे, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीला तिच्या हक्काच्या घरात राहू न देणे हे कौटुंबिक हिंसाचारात मोडते, असेही न्यायालयाने नमूद केले.

पतीच्या निधनानंतर पत्नी त्याच्या घरात राहण्यासाठी गेली. यास पतीच्या बहिणीने विरोध केला. मात्र अतिरिक्त सत्र न्यायालयाने पत्नीला पतीच्या घरात राहण्यास परवानगी दिली. याला बहिणीने याचिकेद्वारे आव्हान दिले. न्या. उर्मिला जोशी-फणसाळकर यांच्या एकल पीठाने ही याचिका फेटाळून लावली.

न्यायालयाचे निरीक्षण

पत्नी पतीसोबत राहत होती याची व्याख्या काwटुंबिक नात्यात करण्यात आली. पत्नी भूतकाळात पतीसोबत राहत होती म्हणजेच ती त्याच्यासोबत होती असा त्याचा अर्थ होतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

वहिनी माझ्या भावासोबत राहत नव्हती

2004 नंतर वहिनी माझ्या भावासोबत राहत नव्हती. त्यांनी घटस्पह्टासाठी अर्ज केला होता. त्यामुळे या घरात ती आता राहू शकत नाही, असा दावा बहिणीने केला होता. तो न्यायालयाने मान्य केला नाही.