
हिमाचल प्रदेशच्या कुलू येथे पर्यटकांच्या गाडीला अपघात झाल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री हा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत.
कुलू येथील बंजार घाटीच्या घियागी परिसरात राष्ट्रीय महामार्ग 305वरून रविवारी पर्यटकांनी भरलेली एक गाडी जात होती. वाटेत एका खडकावरून कोसळल्याने या गाडीला अपघात झाला. या अपघातात सात जण जागीच मृत्युमुखी पडले आहेत.
HP | 7 people killed & 10 others injured after a tourist vehicle rolled down from a cliff at 8:30pm yesterday on NH-305 in Ghiyagi area of Banjar Valley in Kullu. 5 injured are shifted to Zonal hospital, Kullu & 5 are under treatment at Banjar in a hospital: Gurdev Singh SP Kullu pic.twitter.com/FX7GPxQq7T
— ANI (@ANI) September 26, 2022
या अपघातात 10 जण जखमी झाले असून त्यातील पाच जणांना कुलू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर उर्वरित पाच जणांना बंजार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने धाव घेऊन बचाव कार्य सुरू केलं.




























































