सावरकरांवर हिंदी चित्रपट

1710

गांधी जयंतीचे निमित्त साधून विनायक दामोदर सावकर यांच्याकर ‘सावरकर हाजिर हो!’ या हिंदी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. लेखक-दिग्दर्शक ज्ञानेश्वर मर्गज यांनी आपल्या या सिनेमाचा टीझर आणि पोस्टर सोशल मीडियाकर प्रदर्शित करून या हिंदी चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाची निर्मिती आई श्री भगवतीदेवी प्रॉडक्शन्सच्या ज्ञानेश्वर मर्गज यांचीच आहे.

 ते या चित्रपटाद्वारे हिंदीमध्ये पर्दापण करीत आहेत. या चित्रपटात नेमके काय दाखवण्यात येईल याची उत्सुकता वाढली आहे. मात्र कथानकाबरोबरच या चित्रपटाची स्टारकास्टही निर्मात्यांनी अजून गुलदस्त्यात ठेवली आहे. याच महिन्याच्या अखेरीस चित्रीकरणास सुरुवात होणार असून 30 जानेवारी 2020 रोजी तो प्रदर्शित होईल.

 

आपली प्रतिक्रिया द्या