
बांगलादेशच्या गाजीपूर जिल्ह्यात आज आणखी एका हिंदू व्यावसायिकाची मारहाण करून हत्या करण्यात आली. ठार झालेल्या व्यावसायिकाचे मिठाईचे दुकान आहे. दुकानात काम करणाऱया एका अल्पवयीन कर्मचाऱयाला वाचवण्यासाठी त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोरांनी त्याच्यावरच जीवघेणा वार केला.
लिटन चंद्र घोष ऊर्फ काली (55) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचे बैशाखी स्वीटमीट अँड हॉटेल या नावाने दुकान आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता दुकानात आलेल्या मसूम मिया (28) याच्याशी एका क्षुल्लक कारणावरून दुकानात काम करणाऱया 17 वर्षांच्या अनंत दास या कर्मचाऱयासोबत वाद झाला. शाब्दिक वादातून दोघांमध्ये हाणामारी झाली होती.
बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या; गाडीखाली चिरडले, परिसरात तणावाचे वातावरण



























































