
लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2022 च्या 37 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव करून मोसमातील आपला पाचवा विजय नोंदवला, मात्र हा विजय मिळवूनही लखनौच्या संघाला मोठा झटका बसला आहे. हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने आणि आयपीएल आयोजकांनी लखनौ सुपर जायंट्स आणि त्याचा कर्णधार के. एल. राहुलला सामन्यात निर्धारित वेळेपेक्षा कमी गोलंदाजी केल्याबद्दल (स्लो ओव्हर रेट) 24 लाखांचा दंड ठोठावला आहे.
कर्णधार राहुलला धिम्या षटकगतीसाठी दुसऱयांदा दंड ठोठावला आहे. त्यामुळे तिसऱयांदा लखनौ संघाकडून असा अपराध घडल्यास संघनायक म्हणून राहुलला एक सामन्याची बंदीची शिक्षा मॅच रेफरी ठोठावू शकतात.




























































