हजारो भाविकांसाठी शिवसेनेकडून महाप्रसादाची सेवा

60

सामना प्रतिनिधी। हिंगोली

औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त हजारो भाविकांची मांदियाळी जमली होती. दर्शनासाठी येणाऱ्या या भाविकांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी उपवासाचे फराळ व फळवाटप करुन भाविकांची सेवा केली.

औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग देशातील आठवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. श्रावण मासामध्ये नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह हिंदुस्थानातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. सोमवारी तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त हजारो भाविक नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. या भाविकांच्या सेवेसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या वतीने उपवासाच्या फराळाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी जवळपास ४० ते ४५ हजार हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, नगराध्यक्षा सविता चोंढेकर, शिवसेनेचे पं.स. सभापती भिमराव भगत, जि.प. सदस्य प्रतिनिधी डी.वाय. घुगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख जी.डी. मुळे, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी उपसभापती अनिल देशमुख, शिवसेना व युवासेना पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बांगर यांनी नागनाथाला येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी फराळ-पाण्याची व्यवस्था केली होती.

हिंगोलीसह परभणी, नांदेड, लातुर, बीड, संभाजीनगर व विदर्भातील वाशीम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमारावती आदी जिल्ह्यातील भाविकांनी औंढा नागनाथ येथे येऊन दर्शन घेतले. तसेच बाहेरील जिल्ह्यातील शिवभक्तांनी कावडयात्रा काढुन औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने औंढा नागनाथ मंदिर संस्थान येथे भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, औंढा नागनाथसह हिंगोली येथील जलेश्वर महादेव मंदिर, ओमअमृत कयाधु महादेव मंदिर, पोत्रा येथील पवित्रेश्वर महादेव मंदिर, वैजापुर येथील महादेव मंदिरासह जिल्हाभरातील महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या