
सामना ऑनलाईन । नाशिक
महिलांचे सबलीकरण व्हावे, वेगळ्या वाटेने जावून महिलांनी ओळख निर्माण करावी, यासाठी हिरकणी ग्रुप सर्वतोपरी मदत करणार आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये प्रथमच हा ग्रुप महिलांसाठी महिलांनी चालविलेल्या पर्यावरणपूरक पिंक ई-रिक्षा आणणार आहे.
हिरकणी ग्रुप पर्यावरणपूरक ई-रिक्षा नाशिकमध्ये आणत आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी फॅशन शो उद्या रविवारी, 17 मार्च रोजी वृंदावन लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे. रिक्षा चालविण्यासाठी महिलांना आरटीओ परवाने, मोफत प्रशिक्षण, स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.





























































