‘एम्स’ संस्थांना ऐतिहासिक नावे देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) संस्थेसह देशातील ‘एम्स’ संस्थांना ऐतिहासिक नावे देण्यावर केंद्र सरकार ठाम असल्याचे सांगितले जाते. देशात 23 ‘एम्स’ संस्था आहेत. त्यांनीच नावे सुचवावीत असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कळवले होते.

‘एम्स’ संस्थांचे नाव समान आहे. फक्त त्यांची ठिकाणे वेगवेगळी आहेत. त्यामुळे या संस्थांना स्वतंत्र नावे देण्याचा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाने तयार केला आहे. स्वातंत्र्य लढय़ात योगदान दिलेले स्वातंत्र्य सैनिक, प्रादेशिक पातळीवर इतिहास घडवलेल्या व्यक्ती, ऐतिहासिक स्थळे यांची नावे ‘एम्स’ संस्थांना द्यावीत, जेणेकरून त्या संस्थांची एक वेगळी भौगोलिक ओळख निर्माण होईल असा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा  प्रस्ताव आहे