
हिस्ट्री टीव्ही 18 च्या ‘इंडिया: मार्व्हल्स अँड मिस्ट्रीज’ या पुरस्कार विजेत्या डॉक्युसिरीजचा पुढचा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. जगप्रसिद्ध लेखक विल्सम डॅलरिंपल हे या डॉक्युसिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेली तथ्ये, रहस्ये, कहाण्या पुन्हा उजेडात आणण्याचा, मानवी मनाला पडलेल्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा या डॉक्युसिरीजद्वारे प्रयत्न करण्यात आला आहे. ही उत्तरे शोधण्यासाठी भारतातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जागा, पुरातन वास्तू यांना भेटी देण्यात आल्या असून काळाच्या उदरात गाडली गेलेली उत्तरे शोधून बाहेर काढली जाणार आहेत.
हजारो लाखों वर्षांपूर्वीची मानवी संस्कृती, भारतातील साम्राज्ये, त्याकाळी आपल्या पूर्वजांनी कोणतीही प्रगत साधने नसतानाही निर्माण केलेल्या वास्तू हे सगळं या डॉक्युसिरीजमधून आपल्याला पाहाता येईल. डॉक्युसिरीजचा प्रत्येक भाग हा अर्धा तासांचा असून यामध्ये भारताच्या विविध भागांचा इतिहास त्याच्याशी निगडीत रहस्ये, गूढ, अगम्य बाबी अशा असंख्य गोष्टींचा उलगडा करून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.



























































