बँकाचे 8100 कोटी बुडवून फरार झालेल्या कर्जबु़डव्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंजाब नॅशनल बँकेचे कोट्यावधी रुपये घेऊन फरार झालेल्या नीरव मोदीला अटक झाल्यानंतर आता बँकांचे 8100 कोटी बुडवून फरार झालेल्या हितेश पटेल याला पोलिसांनी अटक केली आहे. हितेशला अल्बानिया येथे अटक झाली असून लवकरच त्याला हिंदुस्थानात आणण्यात येणार आहे.

 

गुजरातमधील फार्मा कंपनी स्टर्लिंग बायोटेकचा मालक हितेश पटेल याने शेल कंपनींच्या नावाखाली अनेक छोट्या मोठ्या कंपन्या स्थापन करून बँकाकडून 8100 कोटींचे लोन घेतले होते. त्यानंतर हितेश पटेल हिंदुस्थानातून फरार झाला होता. हितेशविरोधात 11 मार्चला रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर त्याला अल्बानिया देशाच्या तिराना येथून नॅशनल क्राईम ब्युरोने ताब्यात घेतेल. सध्या अंमलबजावनी संचलनालय हितेश पटेलला हिंदुस्थानात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.