हिजबुल मुजाहिद्दीन मोठा हल्ला करण्याच्या तयारीत, गुप्तचर यंत्रणांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिजबुल मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना जम्मू कश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची योजना आखत असल्याचे समोर आले आहे. गुप्तचर यंत्रणांनी सर्व सुरक्षा यंत्रणेंना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रियाझ नायकूच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हिजबूल काहीतरी मोठी योजना आखत आहे. टाईम्स नाऊने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जम्मू कश्मीरमधील पुलवामातील अवंतीपोरा येथे 6 मे रोजी झालेल्या चकमकीत हिजबूल मुजाहिद्दीनचा जम्मू कश्मीरमधील कमांड रियाझ नायकू याच जवानांनी खात्मा केला होता. रियाझ नायकूचा खात्मा हा हिजबुलसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता हिजबूल बदला घेण्याच्या प्रयत्नात आहे. हिजबुलचा नवा कमांडर अश्रफ मौलवी हा अनंतनागवरून किश्तवाडला गेला आहे. तसेच गुरेझ सेक्टरमधून हिजबुलचे पाच दहशतवादी हिंदुस्थानात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. अश्रफ हा किश्तवाडमध्ये सुरक्षा यंत्रणांवर हल्ल्याची योजना बनवत आहे असा इशारा देण्यात आला आहे.