एलिना नॉर्मन यांचा सीईओपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एलिना नॉर्मन यांनी हॉकी इंडियाच्या सीईओपदाचा राजीनामा दिला आहे. त्या मागील 13 वर्षांपासून हॉकी इंडियाच्या सीईओ होत्या. नॉर्मन यांच्या कार्यकाळात हिंदुस्थानच्या पुरुष आणि महिला हॉकी संघांनी नवीन उंची गाठली.

एलिना नॉर्मन यांच्या काळात हिंदुस्थानी हॉकी संघाने जागतिक क्रमवारीतही सर्वोत्तम प्रगती केली. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानी पुरुष संघाने तब्बल 41 वर्षांनंतर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.

एलिना नॉर्मनचा कार्यकाळ
हिंदुस्थान हॉकी फेडरेशनने एलिना नॉर्मनच्या नेतृत्वाखाली 2018 आणि 2023 मध्ये पुरुष हॉकी विश्वचषकाचे सलग दोनदा आयोजन केले होते. याशिवाय 2016 आणि 2021 मध्ये दोन ज्युनियर पुरुष विश्वचषकांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच हॉकी इंडिया लीगच्या पाच सिझनचे यशस्वी आयोजन केले. तसेच एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी, 2015 आणि 2017 मध्ये एफआयएच वर्ल्ड लीग फायनल, 2019 आणि 2024 मध्ये एफआयएच ऑलिम्पिक पात्रता तसेच स्पर्धांचे आयोजन केले.

‘एलिना यांनी हिंदुस्थानी हॉकीच्या योगदानासाठी वेळ आणि समर्पणाबद्दल मी आभार मानतो. केवळ हॉकी इंडियाचा अध्यक्ष या नात्यानेच नाही, तर एक माजी खेळाडू आणि उत्कृष्ट हॉकीप्रेमी या नात्याने गेल्या 12-13 वर्षांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मी औपचारिकपणे स्वीकार करतो. त्यांच्या योगदानाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.
– दिलीप तिर्की
(अध्यक्ष, हॉकी इंडिया)