गृहमंत्री वळसे-पाटलांच्या खासगी सचिवांच्या गाडीतून 50 हजार चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

फलटणमध्ये लग्न सोहळ्यासाठी गेलेले राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे खासगी सचिव बाबासाहेब शिंदे यांच्या वाहनातून 50 हजार रुपयांची चोरी झाली. पैशांबराबेरच त्यांच्या गाडीतील महत्त्वाची कागदपत्रेही चोरीला गेल्याने खळबळ उडाली.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे खासगी सचिव बाबासाहेब शिंदे हे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील धुळदेव येथे एका लग्न सोहळ्यासाठी आले होते. मात्र, लग्न सोहळ्यातून परत गाडीकडे आले असता त्यांच्या वाहनाची काच फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी वाहनातील 50 हजार रुपयांची रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर बाबासाहेब शिंदे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित प्रकाराची तक्रार दिली. याप्रकरणी फलटण पोलीस शोध घेत आहेत.