पॅरिसची सफर : माधव देवचके – बागेश्री जोशी

513

माधव आणि बागेश्री. जगातील सर्वात श्रीमंत शहरातील मधुचंद्र.

मधुचंद्र म्हणजे – एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि लग्नाच्या धावपळीतून निवांतपणा मिळवण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे मधुचंद्र.
फिरायला कुठे गेला होतात? – फिरायला आम्ही पॅरिसला गेलो होतो आणि दोघांनीही एकत्र ठरवून त्या ठिकाणाची निवड केली होती.
तिथे आवडलेले ठिकाण? – नक्कीच आयफेल टॉवर आणि पॅरिसमधील ऐतिहासिक ‘नोत्र दाम कॅथेड्रल’ ही दोन ठिकाणं आवडली.
ठिकाणाचे वर्णन – जगातील सर्वात श्रीमंत आणि समृद्ध शहर. फ्रान्समधील लोकप्रिय वास्तूंमध्ये ‘नोत्र दाम कॅथेड्रल’आहे. हे फार प्राचीन असे कॅथेड्रल आहे. या चर्चचं बांधकाम गॉथिक शैलीतलं आहे. काही महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीत या कॅथेड्रलचे बरेच नुकसान झाले.
तिथे केलेली शॉपिंग – माझ्या बायकोला परफ्युम्स आणि बॅग्सची प्रचंड आवड आहे. त्यामुळे त्याची बरीच शॉपिंग केली होती.
काही खास क्षण – आयफेल टॉवरच्या फर्स्ट प्लॅटफॉर्मवर टूर आयफेल रेस्टॉरेण्टमध्ये केलेला डिनर हा आठवणीतला क्षण आहे.
मधुचंद्र हवाच की… – हो नक्कीच हवा. लग्नाच्या धावपळीत दोघांसाठी निवांत वेळ मिळणं आणि एकमेकांना समजून घेणं फार महत्वाचं असत. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्यासाठी मधुचंद्र हवाच.
एकमेकांना ओळखण्यासाठी किती दिवस द्यावेत… – हे प्रत्येक ंdव्यक्तीवर अवलंबून असतं. पण माझ्या मते एकमेकांना ओळखण्यासाठी किमान सात-आठ महिने तरी लागतात.
तिथला आवडलेला खाद्यपदार्थ – नटेला बनाना क्रेप.
मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – उत्तम आहे. आमच्या लग्नाला पाच वर्ष झाली. त्यात अनेक चढ-उतार आले पण ती कायम माझ्यासोबत भक्कम उभी राहिली. मुळात ती समजूतदार आहे. फक्त समजून घ्यायचे म्हणून घेत नाही. कुठे माझे काही निर्णय चुकीचे वाटत असतील किंवा मी कुठे चुकीचे वागलो तर ती तसे सांगते. ती माझ्या क्षेत्रातील नसल्यामुळे तिच्याकडून सामान्य लोकांच्या काय प्रतिक्रिया असू शकतात ते कळते. त्यामुळे तिचे दृष्टीकोन जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं. ते मला आवडतं. तिने सांगितल्यावर माझ्यात बदल करण्याचा प्रयत्न करतो. संसारात तिचं मत महत्त्वाचं असतं.

आपली प्रतिक्रिया द्या