
कोरोना महामारीच्या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेकजण मधाचा वापर करत आहेत. तसेच वजन कमी करण्यासाठीही मधाचा वापर करण्यात येतो. मात्र, आपण वापरत असलेला मध शुद्ध आहे का,याची खातरजमा करण्याची गरज आहे. सेंटर फॉर सायन्स अॅण्ड इनव्हारयमेंटने केलेल्या चाचणीत अनेक ब्रँडेड मधामध्ये ऊेसळ असल्याचे निष्पन्न झाले आहे. या मधामध्ये सुगर सिरपची भेसळ होत असल्याचे दिसून आले आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या निकषानुसार विविध ब्रँडच्या मधाची चाचणी करण्यात आली. या मधामध्ये सी 3 आणि सी 4 या सुगर सिरपची भेसळ होत असल्याचे आढळले आहे. तर चीनहून येणाऱ्या फ्रुक्टोज सिरपचीही अनेक मधामध्ये भेसळ होत आहे. चीनहून येणारे हे सिरप चार पाच वर्षांमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये दिसून आले नव्हते.
सुमारे 22 ब्रँडच्या मधामध्ये 77 टक्के शुगर सिरपची भेसळ असल्याचे आढळले आहे. डाबर, पंतजली, बैद्यनाथ, झंडू, हितकारी, हिमालया या बँडचे मध एनएमआर चाचणीत अपयशी ठरले आहे. तर सफोला, सोनहा आणि नेचर नेक्टर या ब्रँडचे मध सर्व चाचण्यांमध्ये योग्य असल्याचे आढळून आले आहे. 13 ब्रँडच्या मधापैकी फक्त तीनच ब्रँडचे मध चाचणीत योग्य ठरले आहेत. एकूण 22 ब्रँडच्या मधाची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 17 ब्रँडमध्ये शुगर सिरपची भेसळ असल्याचे निष्पन्न झाले आहे.



























































