नवनिर्वाचित शिवसेना नेत्यांचा उद्या सन्मान सोहळा, उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवार, 3 डिसेंबर रोजी नवनियुक्त शिवसेना नेत्यांचा सन्मान होणार आहे. विलेपार्ले पूर्व येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह येथे सायंकाळी 6 वाजता हा ‘सन्मान सोहळा’ पार पडणार आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कलिना विधानसभा क्षेत्र विभाग क्र. 6 च्या वतीने आयोजित या सन्मान सोहळय़ात नवनियुक्त शिवसेना नेते- खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, राजन विचारे, शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब, रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

कलिना मतदारसंघाचे आमदार संजय पोतनीस, विभागप्रमुख डॉ. महेश पेडणेकर, विभाग संघटक अश्विनी मते यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत आहे. सुप्रसिद्ध पार्श्वगायक बाबुल सुप्रियो यांचा संगीत कार्यक्रमदेखील होणार आहे. सुप्रिमो फाऊंडेशनच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.