पाहा व्हिडीओ: हलगीच्या तालावर घोड्यांनी धरला ठेका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । करमाळा

करमाळा तालुक्यातील कंदर येथे राज्यस्तरीय अश्वनृत्य स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात अश्वप्रेमी आपल्या अश्वांसह सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्या अश्वाला ‘महाराष्ट्र केसरीची गदा’ देऊन सन्मानीत करण्यात आले. या अश्वनृत्य स्पर्धेमध्ये करमाळा तालुक्यातील दहिगावच्या आप्पा लोखंडे यांच्या राजा नावाच्या अश्वानं महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. हलगी आणि ताश्याच्या  तालावर ताल धरणाऱ्या घोड्यांच नृत्य पाहण्यासाठी अश्वप्रेमी आणि नागरिकांनी मोठी  गर्दी केली होती. शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या आगळ्या वेगळ्या स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं.