ट्रेंड – अस्सं सासर सुरेख बाई!

सासर असं मिळावं की माहेरची आठवण येऊ नये… असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. हे स्वप्न तेव्हाच पूर्ण होतं, जेव्हा सासू आणि सासरे हे आई-बाबांसारखी काळजी घेणारे मिळतात. सोशल मीडियात सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका गृहिणीच्या सासरचा आहे. त्यात त्या गृहिणीचे सासरे चपात्या भाजताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहिल्यावर प्रथमदर्शनी हा व्हिडीओ त्या तरुणीच्या सासरचा नसून माहेरचा आहे आणि संबंधित वृद्ध व्यक्ती तिचे बाबाच आहेत असं वाटतं. सून आणि सासऱ्यामध्ये यावेळी थट्टामस्करीही पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ https://tinyurl.com/pn24apup या लिंकवर पाहता येईल.