
नॉन-स्टीक भांड्यात कोणतेही पदार्थ सहजासहजी चिटकत नाही. कारण या भांड्यांकरता विशेष असे कोटींग वापरले जाते. परंतु, या भांड्यांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी लागते.
गरम भांडी धुवू नये
बऱ्याच जणांना भांडी गॅसवरुन काढली की ती नळाखाली धरण्याची सवय असते. यामुळे नॉन-स्टिक भांड्याचे कोटींग खराब होते. त्यामुळे नॉन-स्टिक भांडे तापलेले असताना ते सामान्य तापमानावर येऊ द्यावे आणि त्यानंतर ते धुवावे.
साबण किंवा कोमट पाण्याचा वापर करावा
नॉन-स्टिक भांडी धुताना साबण किंवा कोमट पाण्याचा वापर करावा. नॉन-स्टिक भांडी धुताना गरम पाण्याचा वापर करु नये. गरम पाण्याचा वापर केल्याने नॉन-स्टिक भांडी खराब होतात. तसेच डिशवॉशिंग डिटर्जंटचा वापर करावा. यामुळे भांडी दीर्घकाळ टिकण्यास मदत होते.
जळलेली भांडी बेकिंग सोड्याने स्वच्छ करा
अनेकदा स्वयंपाक करताना भांडी जळतात. ही जळलेली भांडी स्क्रबने घासू नये. स्क्रबने भांडी घासल्याने त्याचे कोटींग खराब होते. बेकिंग सोडा आणि थोडेसे पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मऊ स्पंजने हलक्या हाताने घासून भांडी स्वच्छ होतात.
नॉन-स्टिक भांडी तेलाने चमकवा
तुम्हाला नॉन-स्टिक भांडी चमकवायची असेल तर तुम्ही तेलाचा वापर करु शकता. याकरता स्वयंपाकाच्या नॅपकिनवर तेलाचे काही थेंब घ्या आणि त्याने नॉन-स्टिक भांडी साफ करुन घ्या. यामुळे भांडी चमकण्यास मदत होईल. आणि त्या भांड्याचे कोटींग जास्त काळ टिकण्यास मदत होईल.
स्टील स्क्रबचा वापर करु नये
अनेकदा आपण भांडी चमकवावी, याकरता स्टील स्क्रब किंवा स्क्रब पॅडचा वापर करतो. यामुळे स्टीलची भांडी चमकण्यास मदत होते. पण, याचा नॉन-स्टीक भांड्याकरता वापर कधीही करु नये. यामुळे नॉन-स्टीक भांड्याचे कोटींग खराब होते आणि भांडी लवकर खराब होतात

























































