फुफ्फुसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ पाच गोष्टींचा वापर करा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकटाच्या काळात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना रोखण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे फुफ्फुसे तंदुरुस्त असणेही गरजेचे आहे. कोरोनाचे संक्रमण श्वसनमार्गाद्वारे होते आणि कोरोनाचा विषाणू फुफ्फुसात प्रवेश करतो. त्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी फुफ्फुसे तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. फुफ्फुसांची काळजी घेण्यासाठी या पाच गोष्टींचा वापर करून फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. या गोष्टी प्रत्येकाच्या घरातच असतात. त्यामुळे घरगुती उपायांनी फुफ्फुसांची काळजी घेणे सहज शक्य आहे.

आहारात लसूणाचा वापर करणे गरजेचे आहे. अनेकांना त्याचा उग्र गंध आवडत नाही. त्याचा गंध आणि चव आवडत नसली तर त्यात अनेक अँटीबायोटिक्स घटक असतात. त्यामुळे लसूणाचे सेवन केल्यास कोणत्याही संक्रमणापासून ते फुफ्फुसांचे आणि शरीराचे रक्षण करतात. लसूणाचा आहारात समावेश करता येतो. तसेच फोडणीसाठीही ते वापरता येते. मात्र, फुफ्फुसांच्या तंदुरुस्तीसाठी कच्चे लसून खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. हळदीत अँटी इंफ्लामेट्री तत्व असल्याने सर्दी, खोकलासारख्या विकारात हळद गुणकारी ठरते. कोरोना संक्रमणात ताप, सर्दी , खोकला अशी लक्षणे आढळतात. कोरोना संक्रमणात विषाणू श्वसनमार्गात शिरत असल्याने सर्दी ,खोकला होतो आणि घशात खवखव जाणवते. हे त्रास रोखण्यासाठी हळददूध घेणे फायद्याचे ठरते. त्यामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो आणि श्वास घेण्यासाठी फुफ्फुसांना त्रास होत नाही.

श्वासासंबधीचे विकार दूर करण्यासाठी पुदिना आणि पेपरमिंटचा उपयोग होतो. फुफुसांच्या तंदुरुस्तीसाठी मिंट आवश्यक असते. मिंटमुळे फुफ्फुसांची स्वच्छता होते. दिवसातून दोनतीन वेळा मिंट घेतल्याने फुफ्फुसांच्या स्वच्छता आणि शुद्धतेसाठी ते फायद्याचे असते. नेहमीच्या चहाऐवजी ग्रीन टी घेणे शरीरासाठी फायद्याचे असते. तसेच ग्रीनटी बनवणेही सोपे असते. अनेकांना याची चव आवडत नाही. मात्र, दररोज ग्रीन टी घेतल्याने त्याचे फायदे दिसू लागतात. ग्रीन टीमध्ये असलेल्या पॉलिफेनॉल्स आणि अँटी-इंफ्लामेट्री तत्त्वांमुळे फु्फुसांसाठी ग्रीन टी फायदेशीर असतो. मधामध्ये अनेक नैसर्गिक तत्व असतात. कोरड्या खोकल्यावर मध रामबाण उपाय आहे. श्वसन यंत्रणेच्या बळकटीसाठी आणि शरीराला संक्रमणापासून वाचवण्यासाठी मध उपयोगी असते. रात्री झोपण्यापूर्वी मध घेतल्याने चांगली झोप येते. तर दूधासोबत मध घेतल्याने हाडे मजबूत होतात. तसेच मधातील नैसर्गिक तत्वे फुफ्फुसांसाठी फायदेशार असतात. त्यामुळे घरातच असणाऱ्या या गोष्टीचा वापर करून फुफ्फुसे तंदुरुस्त करता येतात.