जुळून येती रेशीमगाठी! तीन फुटाच्या नवऱ्याला अखेर वधु मिळालीच, थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

असे म्हणतात की, जोड्या स्वर्गातच बनून येतात. प्रत्येकाच्या नशिबात काहीतरी चांगले लिहिलेले असते. ज्याच्यासोबत आयुष्य घालवायचं असतं, तो व्यक्ती अखेर मिळतोच. यात थोडा विलंब होऊ शकतो, पण जे नशिबात लिहिले असेल ते निश्चितपणे मिळतेच. याचाच प्रत्यय जोधपूर येथील साक्षी आणि राजसमंद येथील ऋषभकडे पाहून येतो. तीन फुटांच्या या जोडप्याला विवाह थाटामाटात पार पडला आहे.

साक्षी आणि ऋषभ या दोघांची उंची 3 फूट 7 इंचाच्या आसपास असून आहे. साक्षीने बीकॉमनंतर एमबीएचे शिक्षण घेतले असून ती सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्लास घेते. तर ऋषभ स्पर्धापरिक्षेची तयारी करत आहे. 26 जानेवारीला राजस्थानमधील जोधपूर येथे दोघांचा विवाहसोहळा पार पडला. विवाह सोहळ्यासाठी खास हलते स्टेज तयार करण्यात आले होते. यावर उभे राहून दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. या अनोख्या लग्नात वधू-वरांच्या कुटुंबीयांनीसह मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

साक्षीचा भाऊ दिव्य सोनी याने या अनोख्या लग्नाबाबत बोलताना सांगितले की, साक्षी आणि ऋषभ यांचा गेल्या वर्षी साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्यानंतर दोघांनीही काहीतरी अनोखे करण्याचा विचार केला. या दोघांनी सोशल मीडियावर मिनी कपल नावाचे अकाउंट सुरू केले आणि आपले फोटो पोस्ट करण्यास सुरुवात केली. नेटकऱ्यांनीही दोघांच्या पोस्ट उचलून घेतल्या.

ऋषभला लहानपणापासून डान्सची आवड असून लग्नामध्येही त्याने मनमुरात नाचून घेतले. त्याचजी बहीण राधिका आणि प्रतिभा तसेच साक्षीचे भाऊ-बहीण ऋषिराज आणि राजश्री यांनीही लग्नात चांगलाच आनंद लुटला. संपूर्ण शहरात या अनोख्या लग्नाचीच चर्चा सुरू होती.