…तर हृतिक मागणार कंगनाची माफी

797

अभिनेत्री कंगना रनौत व अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील वाद हा आता जगजाहीर झाला आहे. दोघांनी एकमेंकांवर इतकी चिखलफेक केली आहे की आयुष्यात दोघं एकमेकांची तोंडं पाहतील की नाही याबाबत शंकाच आहे. मात्र नुकतंच एका कार्यक्रमात कंगनाने जर ती हृतिक रोशन झाली तर पहिलं काम काय करेल असं विचारलं असता मी कंगनाची माफी मागेन असं म्हटलं आहे.

कंगना नुकतीच इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये आली होती. त्यावेळी कंगनाला निवेदकाने कंगनाला एक प्रश्न विचारला. ‘जर दुसऱ्या दिवशी उठल्यावर ती हृतिक रोशन झालेली असेल तर पहिलं काम ती काय करेल?’ त्यावर कंगना म्हणाली, ‘आमच्यात जे काही झालं आहे ते पाहता जर मी हृतिक रोशन असते तर मी कंगनाला फोन करून तिची माफी मागितली असती’.

 

आपली प्रतिक्रिया द्या