बारावीच्या निकालाचा टक्का घसरला, कोकण विभाग यंदाही अव्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे

बारावीचा यंदाचा निकाल जाहीर झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का घसरल्याचं दिसतंय. गेल्या वर्षी  बारावीचा निकाल ८९.५० टक्के इतका होता तर यंदा हा निकाल ८८.४१ टक्के इतका लागला आहे.

बारावीचा निकाल जाहीर…

  • राज्याचा एकूण निकाल ८८.४१ टक्के…
  • निकालात यंदाही मुलींचीच बाजी…
  • मुलींचा निकाल ९२.३६ टक्के तर मुलांचा निकाल ८५.२३टक्के…
  • निकालाच्या टक्केवारीत कोकण विभागाची बाजी…

विभागवार निकालाची टक्केवारी

  • कोकण विभाग- ९४.८५ टक्के
  • मुंबई विभाग-८७.४४ टक्के इतका लागला आहे.
  • नाशिक विभाग- ८६.१३ टक्के
  • लातूर विभाग- ८८.३१ टक्के
  • पुणे विभाग -८९.५८ टक्के
  • नागपूर विभाग-८७.५७ टक्के
  • संभाजीनगर विभाग-८८.७४
  • कोल्हापूर विभाग-९१ टक्के
  • अमरावती विभाग-८८.०८ टक्के

शाखानिहाय टक्केवारी

  • विज्ञान -९५.८५ टक्के
  • वाणिज्य-८९.५० टक्के
  • कला-७८.९३ टक्के