रशिया-युक्रेन युद्धाचे भीषण परिणाम; 142 बालकांचा मृत्यू, 48 लाख बालक विस्थापित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केल्यापासून युक्रेनमधल्या सुमारे दोन तृतीयांश बालकांना आपली घरे सोडून जावे लागले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या, युनिसेफ या बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थेने ही माहिती दिली आहे. अवघ्या सहा आठवड्यात 48 लाख बालक विस्थापित झाले असून 142 बालक मृत्युमुखी पडले आहेत. Wion News ने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

मारियोपोल आणि खेरसन सारख्या शहरांमध्ये पाणी नाही, स्वच्छतेची सुविधा नाही, अन्न आणि औषधांचा पुरवठाही विस्कळीत झाला आहे. त्यामुळे तिथली स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे, असे युनिसेफच्या आणीबाणी कार्यक्रमाचे संचालक मॅन्यूअल फोंटेन यांनी सांगितले.