विरारमधील ड्रेनेजमध्ये मानवी देहाचे तुकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । वसई

पश्चिमेकडील ग्लोबल सिटी येथे एका सात मजली इमारतीच्या ड्रेनेजमध्ये मानवी देहाचे तुकडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हत्या करून कोणीतरी देहाचे तुकडे ड्रेनेजमध्ये फेकल्याचा संशय असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

विरार ग्लोबल सिटीमधील बचराज इमारतीमधील ड्रेनेज लाइन चोकअप झाली होती, त्यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरली. स्थानिक रहिवाशांनी ड्रेनेजचा पाइप उघडला असता आतमध्ये मृतदेहाचे लहान तुकडे आढळून आले. सोसायटीच्या पदाधिकाऱयांनी पोलिसांना कळवताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासणी केली असता दोन नंबरचा फ्लॅट बंद असल्याचे दिसले. याच फ्लॅटमधून देहाचे तुकडे करून ते ड्रेनेजमध्ये फेकले असावेत असा अंदाज आहे.