
पश्चिम बंगालमध्ये एक संतापजक प्रकार समोर आला आहे. बायकोला सरकारी नोकरी लागल्याने एका माथेफिरु पतीने तिचा हातच कापल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात केतुग्राम येथे घडली आहे.
पश्चिम बंगालमधील बर्धमान जिल्ह्यातील केतुग्राम येथील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार,पिडीत महिलेने नाव रेणू खातून आहे. तर तिच्या पतीचे नाव मोहम्मद शेख उर्फ शरीफुलशेख असे आहे. तिला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात परिचारिका म्हणून नोकरी लागली. ही गोष्ट तिच्या नवऱ्याला अजिबात रुचली नाही. तो निराश झाला. त्याला आता ती नोकरीला लागली तर आपल्याला विचारणार नाही अशी भिती वाटू लागली.
शरीफुलला भिती आहे की त्याची पत्नी नोकरी करायला लागली तर आपल्यापासून दूर होईल आपल्याला सोडून निघून जाईल. तसेच दुसऱ्या माणसासोबत संसार थाटेल याची भिती होती. त्याची भिती एवढी वाढली की, त्याने बायकोला नोकरी करु न देण्याचा निर्णय घेतला. बायकोचे म्हणणे आहे की, तिला एका दिवसासाठी दुर्गापूर जायचे होते. मात्र तिच्या नवऱ्याने तिला घरी बोलावून घेतले. ती घरी आली, रात्री जेवल्यानंतर ती झोपली होती. मात्र नवरा वारंवार बाथरुममध्ये जात असल्याने तिचे त्याला विचारले असता पोट दुखत असल्याचे त्याने सांगितले. पण तो तिच्या विरुद्ध कट रचत होता.
नवऱ्याचा राग एवढा होता की, त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने आपल्या पत्नीचा हातच कापला. पीडितेने सांगितले की, काही वेळातच मला समजले की कोणीतरी माझ्या तोंडावर उशी ठेवली आहे आणि कोणीतरी माझा हात धरला आहे. यानंतर माझा हात कात्रीसारखा कापला गेला. त्यावेळी तिथे तिघेजण होते. बाकीचे तिथून निघून गेल्यावर तिच्या तोंडावर उशी ठेवली. निघताना तिची सर्व कागदपत्रेही घेतली. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पिडीतेला वर्धमान मेडिकल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले, तिथे प्राथमिक उपचारानंतर तिला दुर्गापूर येथील एका खाजगी नर्सिंग होममध्ये हलवण्यात आले.
आता हात कधीच जोडू शकणार नाहीत
रुग्णाचा उजवा हात पूर्णपणे कापल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. प्रकृती चिंताजनक असून कपाळावरही बरीच जखम होती. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेदरम्यान तिचा हात कापावा लागला, कारण तिचा हात पुन्हा कधीही जोडता येणार नाही.
























































