एकाच घरात दोन बायकांनी केली नवऱ्याची वाटणी, गुपचूप लग्न केल्यामुळे पडला भुर्दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील ठाकूरद्वार येथील जेवार परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तिने पहिली पत्नीसोबत असूनही दुसरं लग्न केलं. ही गोष्ट त्याने दुसऱ्या पत्नीला सांगितली नाही, पण एके दिवशी दुसऱ्या पत्नीला हा प्रकार कळला त्यानंतर जे काही घडले ते वाचून अत्यंत आश्चर्यकारक वाटेल.

एका महिलेने दोन महिन्यांपूर्वी जेवार परिसरातील पोलीस स्थानकात एका महिलेने लग्नानंतर पतीने सासरी नेण्याऐवजी भाड्याच्या घरात ठेवले. त्यानंतर त्याला आधीची पत्नी आणि दोन मुले असल्याचे समजले, असे म्हणत न्याय मिळावा, याकरिता पतिविरोधात तक्रार दाखल केली. महिलेने केलेल्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली. पोलिसांनी दोन्ही पत्नींना समुपदेशनासाठी नारी उत्थान केंद्रात पाठवले. येथे समुपदेशक एमपी सिंह यांनी पती आणि त्यांच्या दोन्ही पत्नींना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी दुसऱ्या पत्नीने सांगितले की, ‘2017 साली फोनवर झालेल्या संभाषणात आम्हा दोघांची मैत्री झाली. त्यानंतर आम्ही लग्न केले, पण त्याचे पहिले लग्न झाले आहे, हे सांगितले नव्हते. दोन्ही पत्नींसोबत राहण्याची त्या व्यक्तिची इच्छा होती.

त्यामुळे समुपदेशक एमपी. सिंह यांनी सांगितले की, ‘या व्यक्तिचे पहिले लग्न चार-पाच वर्षांपूर्वी झाले होते. हे दुसऱ्या पत्नीपासून लपवून त्याने तिच्याशी प्रेमविवाह केला. या व्यक्तिला 3 मुले आहेत, हे कळल्यावर वाद वाढला. पहिल्या लग्नामुळे दुसरी पत्नी खूपच नाराज असून तिची फसवणूक झाल्याचे तिचे म्हणणे आहे.’

या प्रश्नावर आता दोन्ही पत्नी आपापल्या सासरच्या घरी स्वतंत्रपणे राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. नवरा दोघांना समान खर्च आणि समान वेळ देईल. त्यानुसार, तो या दोघींकडे तीन -तीन दिवस म्हणजे समान दिवस राहील आणि एक दिवस नवरा स्वत:च्या इच्छेने कोणासोबतही राहू शकतो, असा निर्णय या प्रकरणाबाबत घेण्यात आला असल्याचे एमपी सिंह यांनी सांगितले.