नऊ वर्षीय मुलाच्या फुफ्फुसातून काढला एलईडी बल्ब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका नऊ वर्षीय मुलाच्या फुफ्फुसातून चक्क एलईडी बल्ब काढून डॉक्टरांनी या मुलाला जीवनदान दिल्याची घटना नुकतीच हैदराबादमध्ये घडली आहे.

तेलंगणाच्या मेहबूब नगर येथे राहणाऱ्या नऊ वर्षीय प्रकाशने मित्रांसोबत खेळताना चुकून एलईडी बल्ब गिळला होता. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर कुटूंबियांनी त्याला त्वरित हैदराबादच्या रूग्णालयात दाखल केले. सीटी स्कॅनमध्ये एलईडी बल्ब प्रकाशच्या फुफ्फुसात गेल्याचे डॉक्टरांना आढळले. बालरोगतज्ञांनी ब्रॉन्कोस्कोपी करत अवघ्या 10 मिनिटांत एलईडी बल्ब बाहेर काढला. त्याच दिवशी प्रकाशला डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. डॉक्टरांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.