
सामना ऑनलाईन,नवी दिल्ली
चार्लस् डार्विन यांचा ‘उक्रांती’चा सिद्धांत खोटा ठरवणारे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग हे आपल्या मतावर ठाम आहेत. ‘निदान माझे पूर्वज तरी माकडे नव्हती’ असे सांगतानाच डार्विनचा तो सिद्धांत शास्त्रीयदृष्टय़ा चुकीचाच आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे. रसायन शास्त्रात ‘पीएचडी’ मिळवली आहे, असे सांगून ते म्हणाले की, आपण विचार करायला शिकले पाहिजे. एखाद्याच्या मताचा आवेशात विरोध आणि निषेध करणे याग्sय नाही. माझे डार्विनच्या सिद्धांतावरील म्हणणे लोक आज नाही तर उद्या किंवा उद्या नाही तर १०-२० वर्षांनी मान्य करतील. डॉ. सिंग यांनी याआधी डार्विनचा उक्रांतीचा सिद्धांत चुकीचा असल्याचे सांगत अभ्यासक्रमात त्या अनुषंगाने बदल करण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यावरून मोठे वादंग माजले होते.




























































