टीम इंडियातील ‘या’ खेळाडूचा भाजपला जाहीर पाठिंबा

137
रविंद्र जाडेजा हा हिंदुस्थानचा पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज आहे.
रविंद्र जाडेजा हा हिंदुस्थानचा पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज आहे.

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघातील डावखुरा फिरकी गोलंदाज आणि वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात जागा मिळवण्यात यशस्वी ठरलेला रवींद्र जाडेजा याने भाजपला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. आपल्या अधिकृत हँडलवरून ट्वीट करत त्याने ही माहिती दिली.

माझा भाजपला पाठिंबा आहे, असे लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्याने हे ट्वीट टॅग केले आहे. त्यापुढे #rivabjadeja jai hind असेही लिहले आहे. तसेच सोबत भाजपचे निवडणूक चिन्ह कमाळाचा फोटो देखील ट्विट केला आहे. रवींद्र जाडेजाच्या या ट्वीटला मोदींनी रिट्वीट करत त्याचे आभार मानले आहेत. तसेच 2019 च्या वर्ल कपसाठीच्या हिंदुस्थानच्या क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा हिने एक महिना अगोदरच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता पत्नीच्या पावलावर पाऊल ठेवत रवींद्र जाडेजाने भाजपला खुलं समर्थन दिले आहे. जाडेजाच्या या निर्णयाचं चाहत्यांनी स्वागत केले आहे. मात्र त्याचवेळी अनेकांनी त्याला राजकारणाआधी वर्ल्ड कप वर लक्ष द्यायाला सांगितले आहे.

जाडजाने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी मोदींची भेट घेणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचेही त्याने म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या