
तामिळनाडूतील कुनूर शहरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. देशाचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत व त्यांच्या पत्नी या हेलिकॉप्टरने प्रवास करत होत्या. खराब वातावरणामुळे हा अपघात झाल्याचे समजते. या दुर्घटनेत बिपीन रावत हे गंभीर जखमी झाले असून त्यांना वेलिंग्टन जवळील रुग्णालयात नेण्यात आले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चौदा जण प्रवास करत होते. घटनास्थळावरून बचाव पथकाने चार मृतदेह बाहेर काढले आहेत.
Four bodies recovered, three injured persons rescued from IAF helicopter crash site in TN: Official sources
— Press Trust of India (@PTI_News) December 8, 2021
CDS Bipin Rawat, his staff and some family members were in the Mi-series chopper that crashed between Coimbatore and Sulur in Tamil Nadu. Search and rescue operations launched from nearby bases: Sources pic.twitter.com/kZKBoEV9Ix
— ANI (@ANI) December 8, 2021
Military chopper crashes in Tamil Nadu. Senior officials were on board. More details awaited. pic.twitter.com/j3jXy66q6k
— ANI (@ANI) December 8, 2021
बिपीन रावत हे त्यांची पत्नी व इतर काही अधिकाऱ्यांसोबत उटी शहरात एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यांचे हेलिकॉप्टर कुनूरच्या घनदाट जंगलातून जात असताना दुर्घटनाग्रस्त झाले. हे हवाई दलाचे IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर होते. हे हेलिकॉप्टर हवाई दलाचे सर्वात सुरक्षित हेलिकॉप्टर मानले जाते.



























































