
सामना ऑनलाईन । लंडन
क्रिकेट वर्ल्डकप सुरू होण्यास 6 दिवस बाकी आहेत. क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सहभागी झालेले सर्व संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत आणि सध्या सराव लढतींना सुरुवात झाली आहे. या दरम्यान क्रिकेटच्या या कुंभमेळ्यामध्ये सहभागी संघाच्या कर्णधारांनी फोटोसेशन केले आहे. या फोटोसेशलमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा शाही अंदाज दिसून आला. विराटचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#ICCWorldCup क्रिकेट इतिहासात पहिल्या त्रिशतकीय भागिदारीचा मान हिंदुस्थानी जोडीला
ग्रुप फोटोमध्ये विराट निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये खुर्चीवर बसलेला दिसून येत आहे. त्याच्या मागे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन उभा आहे. या फोटो विराट आणि विलियम्सनचा खास अंदाज दिसून येत आहे. त्यांच्यातील उर्जा या फोटोतून दिसून येत आहे. या फोटोवर अनेक कमेंट येत असून राजासारख्या बसलेल्या विराटची प्रशंसा होत आहे.

























































