टीम इंडियाला मोठा धक्का, विजय शंकर व शिखर धवन जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

वर्ल्डकप जिंकण्यासाठी सज्ज झालेल्या टीम इंडियाला स्पर्धेच्या पाच दिवस आधी जबरदस्त धक्का बसला आहे. टीम इंडियाचे दोन फलंदाज विजय शंकर व शिखर धवन हे जखमी झाले आहेत.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार प्रॅक्टिस सेशनच्या टीमचे बॅटींग कोच संजय बांगर यांनी केलेल्या गोलंदाजीच्यावेळी शिखर धवन याच्या चेहऱ्याला बॉल लागला. त्यावेळी त्याच्या ओठातून रक्त यायला लागले. त्यानंतर शिखर धवन हा प्रॅक्टिस अर्ध्यावर सोडून गेला. तसेच शंकर विजय यांच्या देखील खांद्याला इजा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जर धवन व शंकर हे पहिल्या सामन्यात खेळले नाही तर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत सध्या चर्चा रंगली आहे.