यंदाचा आयसीसी टी-20 वर्ल्डकप 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान यूएई आणि ओमानमध्ये रंगणार आहे. बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. हा वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी आतापर्यंत कोणत्या संघांनी याचा चषक उंचावला ते पाहूया…
1 / 6
2016 - हिंदुस्थानमध्ये झालेला हा वर्ल्डकप वेस्ट इंडीजने जिंकला. अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजने इंग्लंडचा 4 विकेट्सने पराभव केला होता.
2014 - बांग्लादेशमध्ये झालेला हा वर्ल्डकप श्रीलंकेने जिंकला. अंतिम लढतीत श्रीलंकेने हिंदुस्थानचा 6 विकेट्सने पराभव करत बाजी मारली होती.
2012 - श्रीलंकेत आयोजित हा वर्ल्डकप वेस्ट इंडीजने जिंकला होता. अंतिम लढतीत वेस्ट इंडीजने श्रीलंकेला 36 धावांनी पराभूत केले होते.
2010 - वेस्ट इंडीजमध्ये झालेला हा वर्ल्डकप इंग्लंडने जिंकला होता. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 7 विकेट्सने पराभव केला होता.






























































