
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) हिंदुस्थानात होत असलेल्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी करार केलेला आहे. त्यामुळे ते आता पलटी मारू शकत नाही, अशी तंबी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (आयसीसी)ने ‘पीसीबी’ला दिली आहे. पाकिस्तान सरकारच्या मंजुरीनंतर क्रिकेट टीम हिंदुस्थानच्या दौऱयावर येईल. अद्याप पाकिस्तानी सरकारने क्रिकेट संघाला हिंदुस्थानात खेळण्याची परवनगी दिलेली नाही. त्यांच्या परवानगीवरच पाकिस्तानचे भवितव्य अवलंबून आहे, असे नाटक आता ‘पीसीबी’कडून सुरू झाले आहे.
आम्ही सरकारच्या सातत्याने संपका&त आहोत. त्यांच्याकडून परवानगी मिळाली तरच आम्ही हिंदुस्थानात विश्वचषक स्पर्धा खेळायला येऊ शकतो, असे सांगत पाकिस्तानी क्रिकेट संघाचे अजूनही सारे काही तळय़ात-मळय़ात दिसत आहे, मात्र ‘पीसीबी’च्या या वक्तव्यानंतर ‘आयसीसीने’ सज्जड दमच भरला आहे. ‘पीसीबी’ने विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी करार केला आहे. त्यामुळे ते हा करार पाळतील याचा आम्हाला विश्वास आहे. स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आता त्यांना पलटी मारता येणार नाही, असेही ‘आयसीसी’ने सांगितले.


























































