ICC Women WC 2022 ऑस्ट्रेलिया सातव्यांदा जगज्जेता, इंग्लंडचा पराभव करत जिंकला वर्ल्डकप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेवर ऑस्ट्रेलियाने विजयी मोहोर उमटवली आहे. ऑस्ट्रेलियाने गतविजेत्या इंग्लंडचा 71 धावांनी पराभव करत सातव्यांना विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला आहे.

न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात रंगला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने अॅलीस हेलीच्या 170, रिचेल हेन्सच्या 68 आणि बेथ मूनीच्या 62 धावांच्या जोरावर 356 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ 285 धावांमध्ये गारद झाला. नताली स्किव्हर हिने नाबाद 148 धावा केल्या, मात्र इतर बॅटरकडून साथ न मिळाल्याने ती इंग्लंडला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली.

इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडला तिसऱ्याच षटकामध्ये पहिला धक्का बसला. सलामीवीर डॅनिलय व्हॅट ही स्कूटच्या गोलंदाजीवर 4 धावा काढून बाद झाली. त्यानंतर दुसरी सलामीवीर टॅमी ब्यूमॉन्ट ही सातव्या षटकात 27 धावांवर बाद झाली.

यानंतर ठरावीक अंतराने इंग्लंडने विकेट्स गमावल्या. मात्र नताली स्किव्हर हिने एक बाजून लावून धरली आणि नाबाद 148 धावा केल्या. इंग्लंडच्या इतर कोणत्याही बॅटरला 30 धावांचा आकडाही ओलांडता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून अॅलना किंग आणि जेस जोनासन हिने प्रत्येकी 3, मेगान स्कूटने 2 आणि ताहिला मॅग्राथ व अॅशले गार्डनर हिने प्रत्येकी एक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाचे विजतेपद

1978, 1982, 1988, 1997, 2005, 2013 आणि 2022