
सध्या कोरोनाचे थैमान सुरू आहे. हा विषाणू रोखण्यासाठी गर्दीत जाणे टाळा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. म्हणून ICICI बँकेच्या 500 हून अधिक सेवा या घरबसल्या मिळणार आहेत. मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकींगच्या माध्यमातून हे शक्य असून त्यासाठी ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नसल्याचे बँकेने म्हटले आहे.
#JustIn: ICICI Bank launches ‘#ICICIStack’, a set of the country’s most comprehensive #DigitalBanking services & APIs, to ensure uninterrupted banking experience to customers at a time when they are advised to stay indoors in the wake of the coronavirus outbreak. pic.twitter.com/iAke07eEkZ
— ICICI Bank (@ICICIBank) March 17, 2020
बँकेने ICICI Stack ही सुविधा सुरू केली आहे. त्यानुसार ग्राहकांना घरीच बँकेच्या सोयी सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या सेवांमध्ये नवीन बचत खाते आणि चालू खाते सुरू करण्याच्या सेवेचा समावेश आहे. तसे झटपट कर्ज, झटपट क्रेडिट कार्ड, गृह कर्ज, वाहन कर्जच, ओव्हर ड्राफ्ट, व्यवसायासाठीच्या कर्जासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
वरील सेवांसाठी तुम्ही अर्ज केल्यानंतर बँकेचा प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन तुम्हाल या सेवा देणार. त्यासाठी तुम्हाला बँके जाण्याची गरज नाही. तसेच पैशांचा व्यवहार तुम्ही डिजिटल व्यवहारही करू शकता. त्यात UPI, भारत बिल पेमेंट यांचा वापर करू शकता.
या सेवांसह विमासेवाही डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहे. तसेच फ़िक्स डीपॉजिट, RD, SIP, PPF, NPS Mutual fund सारख्या गुंतवणुकीच्या सेवांचा लाभही तुम्ही घरबसल्या घेऊ शकता.
























































