
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) ने बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. बारावीच्या 2023 च्या परीक्षेत एक किंवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुरवणी परीक्षेला बसले होते तसेच जे विद्यार्थी परीक्षेत मिळालेल्या गुणांवर समाधानी नव्हते अशा विद्यार्थ्यांनीही श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परीक्षा दिली. विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल cisce.org आणि results.cisce.org या वेबसाईटवर पाहता येईल.



























































