शेवटची संधी, स्वस्तात करा रिचार्ज; वाचा काय आहे जुने आणि नवीन प्लॅन्स

5245

देशातील प्रमुख टेलिकॉम ऑपरेटनर कंपनी असलेल्या व्होडाफोन-आयडिया-एअरटेलने आपल्या नवीन प्रीपेड प्लॅनची सोमवारी घोषणा केली आहे. या नव्या प्लॅनअंतर्गत व्हॉइस कॉल आणि डेटाचे दर 42 टक्क्यांनी महागणार आहेत. येत्या 3 डिसेंबरपासून ग्राहकांना नवीन दरानुसार पैसे मोजावे लागणार आहेत. परंतु अजूनही स्वस्तात रिचार्ज करण्याची संधी आहे. कारण नवीन दर हे 2 डिसेंबरच्या रात्रीपासून लागू होणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जुन्याच प्लॅननुसार रिचार्ज करून आपल्या खिशाचा भार थोडा कमी करू शकता.

व्होडाफोन-आयडिया-एअरटेलचे जुने प्लॅन कोणते आहेत याची माहिती घेऊया आणि फायदा उठवूया –

एअरटेलचा 399, 448 आणि 499 रुपयांचा जुना प्लॅन आहे. 399 रुपयांच्या प्लॅमध्ये दिवसाला 1 जीबी डेटा मिळत असून याची वैधता 84 दिवसांची आहे. 448 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला 1.5 जीबी डेटा मिळत असून याची वैधता 82 दिवसांची आहे. 3 डिसेंबरपासून या प्लॅनची किंमत 598 रुपये होणार आहे. तसेच 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला 2 जीबी डेटा मिळत असून याची वैधता 82 दिवसांची आहे. डिसेंबरपासून या प्लॅनची किंमत 698 रुपये होणार आहे. त्यामुळे तुम्हाला 200 रुपये वाचवण्याची अजूनही संधी आहे.

व्होडाफोनचा 399, 458 आणि 509 रुपयांचा प्लॅन आहे. 399 च्या प्लॅनमध्ये दिवसाला 1 जीबी डेटा मिळत असून याची वैधता 84 दिवस आहे. 458 च्या प्लॅनमध्ये दिवसाला 1.5 जीबी डेटा मिळत असून याची वैधता 84 दिवसांची आहे. 3 डिसेंबरपासून या प्लॅनची किंमत 599 रुपये होणार आहे. म्हणजे जवळपास 150 रुपये जास्त खर्च करावे लागतील. यासह 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवासाला 1.5 जीबी टेटा मिळत असून वैधता 90 दिवसांची आहे.

आयडिया कंपनीकडे 84 दिवसांची वैधता असणारा 399 रुपयांचा एकच प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये दिवसाला 1 जीबी डाटा आणि रोज 100 मेसेज मोफत मिळतात. 3 डिसेंबरपासून या प्लॅनची किंमत वाढणार आहे, त्यामुळे संधीचा फायदा घेऊन आजच रिचार्ज करा.

हे आहेत नवे प्लॅन

व्होडाफोन-आयडियाने सर्वात स्वस्त 19 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणला आहे. यात युजर्सना अनलिमिटेड कॉल, डेटा आणि दोन दिवसांची वैधता आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये हायस्पीड डेटा आणि कॉलिंग सुविधा मिळणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. याशिवाय 28 दिवस, 84 दिवस, 365 दिवसांच्या वैधतेचे नवे प्लॅनही आहेत. 1699 रुपयांचा प्लॅनची किंमत आता 2399 रुपये झाली आहे. ही वाढ सर्वाधिक, 41.2 टक्के आहे.

अनलिमिटेड श्रेणीतील दिवसाला 1.5 जीबी डेटा असलेला 84 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन आता 599 रुपयांना मिळेल. सध्या हा प्लॅन 458 रुपयांना मिळत आहे. म्हणजे कंपनीने 31 टक्क्यांची वाढ केली आहे. दिवसाला 1.5 जीबी डेटा देणार्‍या 199 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता 249 रुपये होणार आहे.

299 आणि 399 रुपयांचे पॅक 3 डिसेंबरपासून उपलब्ध होणार आहेत. 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल, 2 जीबी डेटा दररोज, 100 एसएमएस आणि 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. तर 399 रुपयांच्या पॅकमध्ये अनलिमिटेड कॉल, 3 जीबी डेटा, 100 एसएमएस आणि 28 दिवसांची वैधता मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या