
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त संस्थेच्या (आयडॉल) जुलै सत्राच्या प्रवेशास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आजपर्यंत या सत्रात 27 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेतला आहे. प्रवेशाच्या या फेरीत बारावीची पुरवणी परीक्षा उत्तीर्ण झालेले एसएससी बोर्डाचे तसेच सीबीएससी व इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना तसेच ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळाला नाही त्यांना प्रवेश घेता येणार आहे.
पदवी स्तरावरील बीए, बीकॉम, बीकॉम अकाउंट्स अॅण्ड फायनान्स, बीएस्सी आयटी, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम व पदव्युत्तर स्तरावरील एमए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी, हिंदी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्पुटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पीजी डीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू असून प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे. हे प्रवेश ऑनलाइन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयडॉलने केले आहे.
बी.ए. मानसशास्त्र विषय सुरू
बीएमध्ये मानसशास्त्र विषयाला विद्यार्थ्यांची मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. अनेक महाविद्यालयांत तृतीय वर्षी बीएमध्ये मानसशास्त्राचे सहा पेपर उपलब्ध नसल्याने विद्यार्थी मानसशास्त्रापासून वंचित राहतात. या वर्षीपासून आयडॉलमध्ये मानसशास्त्राचे सहा पेपर सुरु करण्यात येत आहे. आयडॉलचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय पेंद्रे असून या ठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे.पालघर येथेही लवकरच विभागीय पेंद्र सुरू होणार आहे.

























































