
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने ट्रम्पकार्ड खेळत प्रियांका गांधी यांची सरचिटणीसपदी निवड केली. प्रियांका यांनी राजकारणात पाऊल टाकल्याच्या दिवसापासून भाजपकडून सातत्याने प्रियांका आणि काँग्रेसवर टीका करण्यात येत आहे. भाजप प्रवक्ते विनय कटयार आणि बिहारचे मंत्री विनोद नारायण झा यांच्यानंतर आता महिला खासदार सरोज पांडे यांनी टिकेचा सूर आळवला आहे.
प्रियांका फक्त दिसायला सुंदर, पण राजकीय कर्तृत्व शून्य; भाजप मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
काँग्रेसला इतक्या वर्षात एकही महिला मिळाली नाही. आता प्रियांका गांधींच्या निमित्ताने पुन्हा एकदा घराणेशाही सुरू झाली आहे. काँग्रेसच्या गुलाब नबी आझाद यांनी प्रियांका गांधींसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरही पांडे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, महिलांविषयी असे खालच्या पातळीचे विचार फक्त काँग्रेसच करू शकते. आता जर त्यांनी हुकमी एक्का म्हणून प्रियांका गांधीला राजकारणात आणले असेल तर, इतके दिवस का जोकर (राहुल गांधी) काम करीत होता का? असा उपरोधिक टोला पांडे यांनी लगावला. तसेच या जोकरमुळे देशाचा वेळही वाया गेला असल्याचेही त्या म्हणाल्या. काँग्रेसला माणसेच मिळत नसल्यामुळे पूर्ण पक्ष घराणे चालवीत आहे. आता पुढील पिढीलाही पक्षात घेऊन कोषाध्यक्षपद देऊन टाका, म्हणजे पूर्ण घरच पक्ष चालवेल, अशी टीका पांडे यांनी केली.
BJP MP Saroj Pandey: Congress couldn’t find a woman worker in their so many years who could be a General Secretary? What they found is a homely woman from Gandhi family. They call her an ace, so this means they were playing with a joker till now. pic.twitter.com/Jf53VZgDY4
— ANI (@ANI) January 28, 2019
महाआघाडीवर टीका
भाजपविरोधात सुरू असलेल्या महाआघाडीवरही पांडे यांनी टीका केली. त्या म्हणाल्या की, हे गठबंधन करणारे सरकार केवळ एका नरेंद्र मोदींच्या विरोधात गठबंधन करीत आहे. गठबंधनात कोणाचेही विचार एक-दुसऱ्यासोबत जुळत नाहीत, याचाच फायदा काँग्रेसला घ्यायचा आहे. त्यांची आतापर्यंत परंपरा आहे, की कोणाचाही पाठिंबा आणि सरकार आले की त्याला काढून टाकायचे. सरकार टिकू न देण्याचेच त्यांचे एकमेव उद्दिष्ट असते, असेही त्या म्हणाल्या.
भाजपमध्ये प्रियांका गांधींपेक्षा सुंदर महिला, भाजपच नेत्याचं बेताल वक्तव्य





























































