
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
प्रियांका गांधी यांच्या राजकीय प्रवेशामुळे भाजपमधील वाचाळवीर पुन्हा एकदा समोर आले आहेत. बिहारचे भाजप मंत्री विनोद नारायण झा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रियांका गांधी सुंदर असल्याने काँग्रेसने त्यांना राजकारणात आणले, परंतु सुंदर चेहऱ्यामुळे मतं मिळत नाहीत, असे वक्तव्य झा यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे.
…म्हणून प्रियांकाने राजकारणात उशिरा पाऊल टाकले, राहुल गांधींचा खुलासा
विनोद झा म्हणाले की, प्रियांका गांधी दिसायला खूप सुंदर आहे, परंतु तिचे राजकीय कर्तृत्व शून्य आहे. प्रियांका गांधी सुंदर असल्याने काँग्रेसने त्यांना राजकारणात उतरवले आहे. परंतु निवडणुकीमध्ये त्यांना याचा फायदा होणार नाही. तसेच त्या रॉबर्ट वाड्रा यांच्या पत्नी असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणात सहभागी असल्याचे आरोप आहेत, असेही झा म्हणाले.
Bihar Min Vinod Narayan Jha on Priyanka Gandhi: Votes can’t be won on basis of beautiful faces. Moreover, she is wife of Robert Vadra who is accused of involvement in land scam&several corruption cases. She’s very beautiful but other than that she holds no political achievement. pic.twitter.com/vFzffKtdrJ
— ANI (@ANI) January 25, 2019
काँग्रेसने झापले
दरम्यान, काँग्रेस नेते प्रेमचंद मिश्रा यांनी झा यांच्या वक्तव्यावरून भाजपची विकृत मानसिकता दिसून येत असताना म्हटले. भाजपची विचारधारा विकृत आहे. तसेच असे वक्तव्य करण्यापूर्वी झा यांनी आपल्या कुटुंबातील महिलांचा विचार करायला हवा होता.
तेजस्वी यादव यांचीही तिखट प्रतिक्रिया
दरम्यान, झा यांच्या वक्तव्यावर तेजस्वी यादव यांनीही तिखट प्रतिक्रिया दिली आहे. नितिश कुमार हे गैरवर्तनाची कार्यशाळा चालवत असल्याची टिका तेजस्वी यादव यांनी केली.
RJD leader Tejashwi Yadav on Bihar Minister Vinod Narayan Jha’s statement on Priyanka Gandhi Vadra,’Votes can’t be won on basis of beautiful faces’: Nitish Kumar Ji is running institute where he trains to abuse&make excuses, his Cabinet Ministers &spokespersons are trained there. pic.twitter.com/OQVGzPtV0Z
— ANI (@ANI) January 25, 2019





























































