बटाट्याची साल काढून टाकत असाल तर, आजपासून ही चूक करु नका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऋतूबदल झाला की बाजारातील भाज्यांमध्येही नानाविध व्हरायटी पाहायला मिळते. बऱ्याचदा भाज्या बनवताना, आपण त्यांची साले काढतो. परंतु काही भाज्यांच्या सालींमध्ये लपलेले पोषक घटक लपलेले असतात? काही भाज्यांची साले फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट स्रोत आहेत. म्हणूनच काही भाज्या या न सोलताच खायला हव्यात.

फळांचा रस की अख्खं फळ खायला हवं, आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम काय

चला जाणून घेऊया कोणत्या भाज्या सोलल्याशिवाय खाऊ नयेत

बटाटा: बटाट्याच्या सालीमध्ये फायबर, पोटॅशियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. त्यांचे सेवन पचन सुधारण्यास मदत करते आणि तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवते. म्हणून, जर तुम्ही साल काढली नाही तर तुम्ही शरीराला फायदा करू शकता.

त्वचा मऊ मुलायम होण्यासाठी स्वस्त आणि मस्त केळ्याचा वापर करायलाच हवा

काकडी: काकडीच्या सालीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन के असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि हायड्रेशनसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. नियमित सेवनाने वजन नियंत्रित करण्यास आणि पचन सुधारण्यास देखील मदत होते. जर काकडी सेंद्रिय असेल आणि पूर्णपणे धुतली असेल तर ती सोलण्याची गरज नाही.

युरिक अॅसिड कमी करण्यासाठी कोणती घरगुती पेये उपयुक्त आहेत, जाणून घ्या

वांगी: वांग्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतात. त्याची साली हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानली जाते. त्याचा रस कर्करोगाचा धोका देखील कमी करतो.

उसाचा रस पिणे कुणी टाळायला हवे, जाणून घ्या

गाजर: गाजरमध्ये भरपूर फायबर आणि अनेक आवश्यक पोषक घटक असतात. जळजळ कमी करण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी ते फायदेशीर मानले जातात.