भांडण झालं तर खून करून या, पुढचं मी बघतो: कुलगुरूंचा अजब सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथील वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यापीठाचे कुलगुरू राजा राम यादव यांनी वादग्रस्त विधान केले आहे. गाझीपूरमध्ये विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात राजाराम यादव यांनी विद्यार्थ्यांना म्हटले की, “रडत रडत माझ्याकडे येऊ नका, खून करून या, पुढे मी बघून घेईन.” राज्यपाल गाझीपूरमधील सत्यदेव महाविद्यालय संकुलात एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. यादव म्हणाले की, ‘जर तुम्ही पूर्वांचल विद्यापीठाचे विद्यार्थी आहात तर रडत माझ्याकडे येऊ नका. एक गोष्ट सांगतो, जर कुणाशी भांडण झाले तर त्याला चांगलाच चोप देऊन या.”

एवढ्यावर कुलगुरू थांबले नाही ते पुढे म्हणाले की, जमलं तर त्याचा खून करून टाका पुढे जे काही असेल ते मी बघून घेईन.”

एनआयने दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ २९ डिसेंबरचा असून २०१७ मध्ये राज्यपाल राम नाईक यांनी राजाराम यादव यांची पूर्वांचल विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली होती. यापूर्वी राजाराम यादव हे अलाहाबाद विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते.