आपले अस्तित्व टिकवायचं असेल तर निसर्गाशी मैत्री करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची महामारी म्हणजे निसर्गाशी प्रतारणा करणाऱया मानवाविरुद्ध निसर्गाने घेतलेला एक प्रकारचा सूडच आहे. आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर निसर्गाशी वेळीच मैत्री करा, असे प्रतिपादन पर्यावरण तज्ञ आणि सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्नमेंटच्या महासंचालिका सुनीता नारायण यांनी केले आहे.

इंडियन ऑईल कॉर्पेरेशनच्या पश्चिम विभागाने पर्यावरण दिनामिमित्त ‘ईकोसिस्टीम रिस्टोरेशन – रिबिल्डिंग रिलेशनशिप वुईथ नेचर’ या विषयावर आयोजित ऑनलाइन चर्चासत्रात त्या बोलत होत्या. प्रत्येक श्वास मोलाचा असतो आणि निसर्गातून मोफत मिळणाऱया ऑक्सिजनमुळेच तो निरंतर सुरू असतो, पण तोच मिळेनासा झाल्यावर माणसाची काय अवस्था होत आहे, हे आपण पाहतोय. माझ्यावर सत्ता गाजवत राहाल तर सर्वनाश ओढवून घ्याल, या निसर्गाच्या इशाऱयाची गंभीर दखल घेण्याची वेळ आल्याचे त्या पुढे म्हणाल्या. इंडियन ऑईलच्या पश्चिमी क्षेत्राचे कार्यकारी निर्देशक (क्षेत्रीय सेवा) सिद्धार्थ बोस यांनी पर्यावरण संवर्धनासंदर्भात इंडियन ऑईलने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली, तर महाप्रबंधक (कॉर्पेरेट संचार) अंजली भावे यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.