
क्यूएस जागतिक एमबीए क्रमवारी 2021 मध्ये आयआयएम अहमदाबाद आणि आयआयएम बंगळुरूने टाँप 50 मध्ये स्थान मिळविले असेल तरी या दोन्ही संस्थांची क्रमवारीत यंदा घसरण झाली आहे. आयआयएम अहमदाबादने 31 वे तर आयआयएम बंगळुरूच्या दोन वर्षीय एमबीए कोर्सने 35 वे स्थान पटकावले आहे. या संस्थांसोबतच आयआयएम कोलकत्ताकोलकत्ताने 51 वे स्थान मिळविले आहे.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा क्रमवारीत घसरण पहायला मिळाली आहे. गेल्यावर्षी या क्रमवारीत आयआयएम अहमदाबाद 27 व्या स्थानावर होते तर आणि बंगळुरूची क्रमवारी 26 अशी होती त्यात यंदा अनुक्रमे 4 आणि 9 अंकांची घट झाली आहे. गेल्यावर्षी आयआयएम बंगळुरूने 26 वे स्थान पटकावून 100 पैकी 63.1 गुण मिळविले होते.
आयआयएम अहमदाबादच्या मॅनेजमेंट विभागाच्या पोस्ट ग्रॅज्युएट कार्यक्रमाला 27 वे स्थान मिळाले होते तर आयआयएम कोलकताला 46 व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदा क्यूबा बिझनेस मास्टर्स रँकिंगमध्ये एशिया पॅसिफिक रिझनमध्ये ग्रेट लेक्स इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट चेन्नई, आयआयएम कोळिकोड, आयआयएम इंदौर, आयआयएम लखनऊ, आयआयएम उदयपूरसह अन्य संस्थांची पहिल्या 101 क्रमवारीत निवड झाली आहे.



























































